शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनात रुजवा  --मेजर गजेंद्र प्रसाद; शिवाजी पदभ्रमंती मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:55 IST

पन्हाळागड ते विशाळगड या पदभ्रमंती मोहिमेतून छात्रांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा मनात रुजवावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले आहे,

कोल्हापूर : पन्हाळागड ते विशाळगड या पदभ्रमंती मोहिमेतून छात्रांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा मनात रुजवावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल महाराष्ट्र राज्य एन.सी. सी.चे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी केले.

अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. २५० छात्रांची पहिली तुकडी या मोहिमेतील पहिल्या टप्प्याकडे रवाना झाली. शिवाजी विद्यापीठ येथील एन. सी. सी. भवन येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. मेजर जनरल गजेंद्र प्रसाद म्हणाले, पदभ्रमंतीमध्ये सर्व कॅडेटस्नी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून या मोहिमेचा पूर्ण अनुभव घ्यावा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून छत्रपतींच्या इतिहासाच्या आठवणी, चरित्र आणि कार्यातून तरुणांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल.

या शिबिराचे नियोजन ५ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनतर्फे करण्यात आले आहे. ही मोहीम ८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील एक हजार छात्र शिबिरात सहभागी होणार आहेत. यासह श्रीलंकेतून सहा छात्र व एक आॅफिसर सहभागी होणार आहेत. पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, पांढरेपाणी, गजापूरसह विशाळगड येथे मोहिमेचा समारोप होणार आहे. हे ५२ किलोमीटर अंतर ते पाच दिवसांत पूर्ण करणार आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये २५० छात्रांचा समावेश आहे. पहिल्या तुकडीमध्ये दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रातील छात्रांचा समावेश होता.

याप्रसंगी ग्रुप कमांडर एन. सी. सी. ब्रिगेडियर आर. बी. डोग्रा, ५ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. कोल्हापूरचे कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, ‘सीपीआर’चे डीन डॉ. सुधीर नणंदकर, सुभेदार मेजर माणिक थोरात, स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूरचे कर्नल एस. वाय. शिंदे, एन. सी. सी. आॅफिसर बाजीराव भोसले, एन. सी. सी. आॅफिसर, सुभेदार, पी.आय. स्टाफ, सिव्हिल स्टाफ, कर्मचारी उपस्थिती होते.

 कोल्हापुरातील एन.सी.सी. भवन येथे अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती शिबिरास झेंडा दाखवून उद्घाटन करताना मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, एन. सी. सी. ब्रिगेडिअर आर. बी. डोग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, डॉ. सुधीर नणंदकर, आदी उपस्थित होते.अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंतीसाठी गुरुवारी कोल्हापुरातील एन.सी.सी. भवन येथून पहिली तुकडी पन्हाळ्याकडे रवाना झाली. 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर